शब्दा कडून सृष्टी कडे
उद्देश : शब्दसंपत्ती वाढविणे
सूचना : हा खेळ कितीही मुलांना खेळता येईल
येईल जितकी मुले असतील तितकी अक्षरे घ्यावीत. पहिल्या मुलाने अक्षर सांगितल्यावर प्रत्येकाने लिहायला सुरुवात करावी. ज्याचे सगळ्या दहा गटातील शब्द लिहून होतील तो थांबा म्हणेल . मग सगळेजण थांबतील. नंतर पुढचा मुलगा दुसरे अक्षर सांगेल. पुन्हा खेळ सुरू होईल .शेवटच्या अक्षरा पासूनचे शब्द बनवल्यानंतर खेळ संपेल. सर्वात जास्त शब्द बनविणारा विजयी होईल.
१) अक्षर २) पक्षी ३) प्राणी ४) फळ ५) फूल ६) गाव ७) भाजी ८) वस्तू ९) खाद्य १०) मुलाचे नाव ११) मुलीचे नाव
उदाहरणार्थ : म - मैना माकड ,मोसंबी, मोगरा ,मिरज ,मुळा, माठ ,मलई ,मोहन ,मीना
ब- बदक ,बैल ,बेदाणा , बकुळ ,बेळगाव ,बीट ,बादली ,बासुंदी ,बबन ,बिना
हा खेळ तुमच्या वहीत संग्रहित करून ठेवा..

0 Comments