शब्दसम्राट कोण ?
उद्देश : मुळाक्षरांपासून कानामात्रासहित शब्द तयार करणे.
सूचना : हा खेळ कितीही मुले खेळू शकतील.
वेळ : २५-३० मिनिटे
प्रत्येक गटातील वेगवेगळे अक्षर प्रथम घ्या व त्याला इतर अक्षरे जोडून जास्तीत जास्त शब्द तयार करा.त्याच प्रमाणे तयार झालेले शब्द तुमच्या वहीत लिहून घ्या.व त्याचे वाचन करा.
गट- १ ) अ , आ , इ , ई , उ , ऊ , ए , ऐ , ओ , औ , अं ,
२ ) क ख ग घ
३ ) च छ ज झ
४ ) ट ठ ड ढ
५ ) त थ द ध न
६ ) प फ ब भ म
७ ) य र ल व श
८ ) ष स ह ळ क्ष ज्ञ
उदा: अक्षर : अ - अट ,अक्षर ,अमर ,अटक ,अनल ,अननस ,अबब ,अवचित
क - कल ,कळ ,कर ,कस,करवत ,कसर,कहर ,कलह ,कपट ,कसरत ,कणखर ,कलरव ,कमर ,कलकल कड ,कद
या प्रमाणे सर्वात जास्त शब्द तयार करणारा /करणारी शब्दसम्राट ठरेल.

0 Comments