ळ चे शोभती शोधा
उद्देश : शब्द संख्या वाढविणे विचारांना चालना देणे.
सूचना : हा खेळ कितीही मुलांना खेळता येईल.
वेळ : दहा मिनिटे.
पुढे काही दोन अक्षरी शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचे समानार्थी शब्द दोन अक्षरी आहे व त्यांचे शेवटचे अक्षर ळ आहे .पुढे दिलेले शब्द तुम्ही दोन मिनिटे बघा व नंतर बरोबर कोणता सोबत येईल तोच शोधा. जो सर्वात जास्त शब्द दिलेल्या वेळेत तयार करेल तो जिंकेल.
उदाहरणार्थ : मुल मूलबाळ
१) शक्ती १३) अरुंद पूल
२) भ्रम १४) कानाची कड
३) बूड १५) उसापासून बनणारा
४) भात १६) कमळाचा देठ
५) आरोप १७) नाटकाचा प्रयोग
६) कपाळ १८) चिकटविण्याचा पदार्थ
७) आरंभ १९) वेदना
८) नुकसान २०) माराची खून
९) खंडकरी २१) हार
१०) गांजणूक २२) समय
११) पाकळी २३) मासे पकडायचे साधन
१२) मोठे आतडे २४) पाण्याच्या तळाशी बसणारा
वरील खेळ अत्यंत आनंददायी आहे.नक्कीच तुम्हाला आवडे.

0 Comments