शब्दांचा खजिना
उद्देश :विशिष्ट अक्षरापासून सुरु होणारे अधिकाधिक शब्द लिहिता येणे.
सूचना : हा खेळ दोन गटात खेळता येईल.
वेळ : २० मिनिटे
शिक्षकांनी मुलांचे दोन गात करावेत.त्याना एक अक्षर द्यावे.प्रथम एकेका गटातील मुलांनी त्या अक्षराने सुरु होणारा दोन अक्षरी एक शब्द सांगावा.शिक्षकांनी प्रत्येक गटाचे शब्द फलकावर लिहावेत.दोन्ही गटाचे दोन अक्षरी शब्द सांगून झाल्यावर तीन अक्षरी शब्द सांगावेत.याप्रमाणे चार,पाच अक्षरांचे शब्द क्रमाक्रमाने सांगावेत.ज्या गटाला जास्तीत जास्त शब्द सांगता येतील तो गात जिंकेल.
उदा: अक्षर "क"
'अ' गट 'ब' गट
कण ,कलश ,कथानक कला,कपट ,कलावंत
कलाकुसर कमकुवत
या प्रमाणे अगदी मजेशीर हा खेळ आहे.हा खेळ खेळताना शब्दांचा खजिना उघडल्या शिवाय राहणार नाही .त्यामुळे हा खेळ अगदी मनोरंजनात्मकरित्या खेळा.

0 Comments