आठवून सांगा
उद्देश : एकाच गटात बसणारे शब्द ओळखा.
सूचना ;हा खेळ कितीही मुले खेळू शकतील
वेळ दहा मिनिटे
प्रथम पहिला मुलगा एका फळाचे नाव सांगेल लगेच दुसरा मुलगा सांगितलेल्या फळाचे नाव उच्चारून आणखी एक फळाचे नाव जोडीन लगेच पुन्हा पुढचा मुलगा सांगितलेली दोन्ही नावे उच्चारून आणखी एक नाव जोडलं ह्या प्रमाणे एकेक नाव जोडत दहाव्या क्रमांकाच्या मुलाने दहा नावांची यादी पटपट सांगावी ज्याला सांगता येणार नाही तो खेळातून बाद होईल जो सर्व नावे सांगू शकेल तो जिंकेल या प्रमाणे प्राणी आणि भाज्यांचा खेळ खेळा मनोरंजनात्मक हा खेळ असून नक्कीच तुम्हाला आवडेल हा खेळ तुमच्या वहीमध्ये लिहून काढा
उदाहरणार्थ :आंबा
आंबा पेरू
आंबा पेरू सीताफळ
आंबा पेरू सीताफळ द्राक्षे
याप्रमाणे पुढे किमान दहा फळांची नावे जोडा खेळासाठी शब्द प्राणी भाज्या हे वापरता येतील .

0 Comments