फुलदाणी
उद्देश : दिलेल्या शब्दांमधून एक अक्षरी,दोन अक्षरी किंवा तीन अक्षरी शब्द शोधणे.
सुचना : हा खेळ एक किंवा एकापेक्षा जास्त मुले खेळू शकतील.प्रत्येक शब्द एक पुष्पगुच्छ आहे असे समजा.त्या गुच्छातून पुढे दिलेल्या सूचनेनुसार पुष्प ( शब्द ) शोधा व त्याना फुलदाणीत सजवा.उदा : ममातीफ या शब्दात मतीफ हा तीन अक्षरी शब्द आहे या प्रमाणे प्रत्येक गटातील शब्द शोधून तुमच्या वहीत लिहून घ्या.
खेळ :१ ) एक अक्षरी शब्द शोधा.
१) माती २ ) तोकडा ३ ) खादाड ४ ) नेता ५ ) जोर ६ ) जाण ७ ) प्रयाग ८ ) हार ९ ) पैसे १० ) मऊ ११ ) भूमिती १२) खवा १३ ) देव १४ ) घेवडा १५ ) तूप
खेळ :२ ) दोन अक्षरी शब्द शोधा.
१) जेवण २ ) जंगल ३ ) मंगळ ४ ) प्रपंच ५ ) भेसूर ६ ) सुंदर ७ ) तडफ ८ ) भूगोल ९ ) पिंपळ १० ) बाभूळ ११) पोफळी १२ ) खजूर १३ ) गजरा १४ ) कमळ १५ ) सुपारी १६ ) सायली १७ ) नाटक १८ ) वजन १९ ) प्रभात
खेळ :३ ) तीन अक्षरी शब्द शोधा.
१ ) कसरत २ ) प्रचारक ३ ) सुंदरता ४ ) प्रभाकर ५ ) चिमुरडा ६ ) गोदावरी ७ ) खोलगट ८ ) कळवीट ९ ) एकाएकी १० ) चाकवत ११) जागरण १२ ) ओवाळणे १३ ) मजेदार १४ ) समाधान १५ ) विनायक १६ ) अवघड १७ ) लागवण १८ ) कनवाळू १९ ) करवट २० ) परिसर
हा खेळ नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही हि खेळा व तुमच्या मित्राला पण सांगा.

0 Comments