शब्दांचा लपंडाव
उद्देश : शब्दसंपत्ती वाढविणे.
सूचना : हा खेळ दोन मुलांना किंवा दोन गटात खेळता येईल .दोन गटात शब्द वाटून घ्या .एका गटाने शब्द सांगावा दुसऱ्या गटाने त्यात लपलेली गोष्ट शोधून काढावी .ज्या गटाला शब्द सापडणार नाही त्याच्यावर भेंडी चढेल .
हा खेळ एकट्यालाही खेळता येईल.
वेळ : शब्दास अर्धा मिनिट.
खेळ १ : खालील शब्दात लपलेले खाद्यपदार्थ शोधा .
पारखी ,शेवटी ,सारवण , रांगोळी ,उत्सुकता , डावखोरा, कवडी , पुजारी , पाचक ,,पखवाज , पावशेर, आवरण , पोकळी , शिकारा , उपमान, डाव , भारतरत्न.
खेळ २: खालील शब्दात लपलेले आकडे शोधा.
एकर् , एकेक, एकतारी , बाराखडी, बाराबंदी , सातवाहन , पाचगणी, लाचार, सहाण , ठसा , साठवण , आठवण , बादशहा , हापुस, सहारा , चादर , पाचक, विचार, -आचार , सहाय्य , हादरा , हादगा , शिष्टाचार ,,नितीन.
खेळ ३ : खालील शब्दात लपलेले शरीराचे अवयव शोधा.
दुकान, मानस्तंभ आभाळ , हकनाक, पाठवणी , मानसशास्त्र , सगळा , भूशिर , कानस , पाठक , पायरी , करारनामा , नोकर, लोकनायक, चरक , मुंगळा, पायपोस, उपाय, दोलायमान , कमान ,तोंडपाठ , पोपट , समान, मानव , गाफील, भटजी , गोगलगाय , दंडवत , आगळा,, कंगाल, तोंडसुख, मानपान, नंदनवन , पाठपोट, बोलपट , नाटक, नायक, अभिमान, नास्तिक , भालचंद्र, कपाळकरंटा , कानाडोळा.

0 Comments