Subscribe Us

भाषिक खेळ-१४

 

अक्षरांची कोलांटीउडी

 उद्देश :दोन अक्षरी शब्दातील पहिल्या अक्षराला असलेली स्वरचिन्हे बदलणे.

 सूचना:हा खेळ दोन गटात खेळता येईल येईल पहिल्या गटात कोणताही दोन अक्षरी स्वरचिन्ह असलेला शब्द द्यावा. दुसऱ्या गटाने तेच स्वरचिन्ह बदलून नवीन शब्द तयार करावा. बरोबर शब्दास एक गुण सांगता न आल्यास शून्य गुण.

 उदाहरणार्थ : पहिला गट -मेळ ( मिलाप ) काळ- ( वेळ )

 दुसरा गट -मळे ( शेतमळे ) कळा ( वेदना )


 खेळ१ : शब्दातील अक्षरांची स्वरचिन्हे बदला.

 अ) १ ) माल २) माळ ३ ) चाल ४ ) गार ५) खार ६) नाळ ७ ) फाळ ८) गाळ ९) धार १०) गाव ११) नाव १२) राव १३)पास

ब) १) तीळ २ ) गीत ३) वीर ४) खीर ५) दीर ६) तीर ७) नीट ८) वीट

क) १) मेळ २) वेड ३) खेळ ४) केस


खेळ २ : शब्दातील अक्षरांची कोलांटी उडी.

सूचना : फक्त अक्षर बदला.स्वरचिन्ह कायम ठेवा.

उदा : बाद -दाबा

अ) ठार गार पास सार बार

ब) टोप पोल डोल मोर डोके

क) तीर दीन लीला

 

वरील खेळाची माहिती आपल्या वहीत लिहून घ्या.व खेळा.नक्कीच तुम्हाला आवडेल.





Post a Comment

0 Comments