पुढे चला
उद्देश : शब्द शृंखला वाढविणे.
सूचना : हा खेळ कितीही मुलांना खेळता येईल.
वेळ : दहा मिनिटे
प्रत्येक मुलाने दोन अक्षरी शब्दाने सुरुवात करावी .नंतर त्या शब्दाचे पहिले अक्षर शेवटी येईल असा दुसरा शब्द सांगावा .अशाप्रकारे प्रत्येक वेळी पहिले अक्षर शेवटी येईल अशा पद्धतीने शब्द कड्या जोडाव्यात व साखळी तयार करावी. दहा मिनिटात जास्तीत जास्त शब्द कड्या जोडणारा जिंकेल.अत्यंत मनोरंजनात्मक आहे नक्कीच तुम्हाला आवडल्या शिवाय राहणार नाही.
चला तर खेळू हा खेळ
उदाहरणार्थ खे: माला -विमा -रवि- पती-साप
अशाप्रकारे तीन अक्षरी शब्द घेऊन खेळता येईल.
मदन -रहीम- समीर- कणीस - कटक-कडक
टीप : कोणतेही शब्द घ्यावेत आणि खेळावे.

0 Comments