पाणबुड्या चा खेळ
उद्देश : शब्द तयार करणे.
सूचना : हा खेळ एकट्याला खेळता येईल.
वेळ : पाच मिनिटे
शब्दाच्या सागरात बुडी मारून असे अक्षर मोती शोधून काढा की ते खालील ममाळामधील रिकाम्या जागी घातल्यावर सुंदर अर्थपूर्ण माळ तयार होईल.
१) स---स पौष्टिक चौरस आहार
२) स---स प्राण्यांच्या व माणसांच्या कसरतीचा खेळ
३) स---स उत्कृष्ट,अधिक चांगले
४ ) न---न नमस्कार,वंदन
५) क --क गव्हाचे पीठ
६) क---क सोने
७) क---क बांबू
८) क---क टणक,कठीण
९) म----म दुखऱ्या जागेवर लावण्याचे औषध
१०) वा--वा आनंदाने दिलेली दाद

0 Comments