पाकळ्या आणि फुले
उद्देश : समानार्थी शब्द बनविणे.
सूचना : हा खेळ कितीही मुले खेळू शकतील.
वेळ : तीन मिनिटे
उदाहरणाप्रमाणे खाली दिलेल्या अक्षरपाकळ्यापासून दिलेल्या
अर्थाकरिता दोन अक्षरी शब्दफुले द्या.
अक्षर पाकळ्या- व ब क च घ ध
ट द झ ड न ळ
उदाहरणार्थ : फळांचा जुडगा -घड
१) पारंब्या असलेले वृक्ष २) शक्ती ३)बोल ४) माराची खूण
५) एका पक्षाचे नाव ६) पाहा ७)हत्या ८) रान ९) कावा
१०) भांडे ११) संपत्ती १२) शरीर १३) लवकर
१४) नाटकात काम करणारा १५) हिवाळ्यात गवतावर पडणारे थेंब
१६) पाकळी १७) पाण्याची तोटी १८) एक सारखे पाहणे
१९) रुची २०) सतत पाऊस पडत राहणे २१) पूजा करताना घालायचे वस्त्र
२२) ही डोंगरात असते.

0 Comments