Subscribe Us

भाषिक खेळ-१५

 

जुन्याचे नवे

 उद्देश : तीन अक्षरी शब्द तयार करणे.

 सूचना : हा खेळ कितीही मुले खेळू शकतील .

वेळ दहा मिनिटे

खाली तीन शब्दांची वाक्य दिलेली आहेत. यातील प्रत्येक शब्दात नवीन तयार होणाऱ्या शब्दांचे एकेक अक्षर लपलेले आहे .ते शोधून तीन अक्षरी शब्द बनवा जो जास्त शब्द तयार करेल तो जिंकेल.

 उदाहरणार्थ : कापूर जपून वापरा ( काजवा )

 सर्वांनी मानाने जगावे.


 १ ) कमल नमन कर.


 २ ) समीर फळयामागे लपला.


 ३ ) वहिनीने जयाला नटवले.


 ४ ) गाण्यात जया रमली.


 ५ ) जथा वाटत नव्हता.


 ६ ) आम्ही वालचंदनगरला जमलो.


 ७ ) आजोबा डप वाजवतात.


 ८ ) आज वाचन जमले.


 ९ ) आशाने काव्य रचले.


 १० ) अलकाने बर्फ बघितला.


 ११ ) कधीही मातू नये.


 १२ ) नाटक यशस्वी करा.


 १३ ) लता लहान नाही.

 १४ ) परागने तंबोरा गमावला .


वरील वाक्यातून अर्थपूर्ण शब्द तयार होतात.ते शोधा व आपल्या वहीत लिहून ठेवा.



Post a Comment

0 Comments