Subscribe Us

भाषिक खेळ-७


  जिभेची वळकटी

 उद्देश : स्पष्ट व स्वच्छ उच्चार करता येणे.


 सूचना : हा खेळ कितीही मुलांना खेळता येईल मुलांना गोलात उभे करावे. खालीलपैकी कुठलाही एक शब्दसमूह घ्यावा .प्रत्येकाने तो न अडखळता व न थांबता म्हणावा.जो अडखळेल तो बाद होईल .न अडखळता जास्त वेळ म्हणू शकेल तो जिंकेल .असेच आणखी शब्दसमूहही मुलांना शोधून काढता येतील. नव्याने तयार करता येतील. मजेशीर हा खेळ आहे नक्कीच तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. 


१ ) कच्चा पापड पक्का पापड

२ ) कच्ची पपई पक्की पपई

३ ) काळे-राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले.

४ ) मोठं नाणं लहान नाणं

५ )  चटईला टाचणी टोचली.

६) काळे कावळे गोरे बगळे


या प्रमाणे अनेक अनेक शब्दसमूह शोधून त्याचे तुमच्या वहीत संग्रहित करा.


Post a Comment

0 Comments