Subscribe Us

भाषिक खेळ-३१


 पाहू ना कोण ?

उद्देश: दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द ओळखणे.

सूचना : हा खेळ कितीही मुलांना खेळता येईल.

वेळ : पाच मिनिटे.


 खाली काही शब्द दिले ले आहेत व प्रत्येक शब्दापुढे तीन शब्द दिलेले आहेत. त्यातील दोन शब्द व त्याचे समानार्थी आहेत व तिसरा शब्द वेगळाच आहे .म्हणजे तो शब्द पाहून आलेला आहे .त्याचा तुम्ही ओळखून त्यापुढे बरोबरची खूण करायची आहे. एका खुणेला एक गुण. जो जास्त गुण मिळवेल तो जिंकेल.


१) महिमा- महत्व मोठेपणा कीर्ती

२) उत्पन्न -- निर्माण जन्मलेले मिळकत

३) विस्तव - राख अग्नी अनल

४) ध्वज -निशाण झेंडा खूण

५) कुतूहल - जिज्ञासा नवल उत्सुकता

६) सूर्य --भानू इंद्र दिनकर

७) चंद्र-वरूण शशी इंदू

८) हात-चरण हस्त कर

९) पर्वत-अहि नग तुंग

१०) वारा-पवन पतंग वायू

११) समुद्र -रत्नाकर इंदू सागर

१२) नदी-सरिता तटिनी वहिनी

१३) व्यर्थ-फुकट वाया महाग

१४) श्रम- कष्ट काम श्रमदान

१५) चेतोहर - सुंदर मनोहर हिरवा

Post a Comment

0 Comments