हरवलेले शोधा
उद्देश :दिलेल्या अक्षरापासून संकेतानौसार शब्द बनविणे.
सूचना :हा खेळ कितीही मुले खेळू शकतील.
वेळ : प्रत्येक खेळास ५ मिनिटे.
प्रत्येक खेळात सर्वात प्रथम शब्द शोधणारा जिंकेल.
खेळ १ : खाली दिलेल्या सहा अक्षरात पुरुषांची,
स्त्रियांची आणि फळांची प्रत्येकी दोन नावे दडलेली आहेत ती शोधा.
म ता सी ळ फ रा
खेळ २ :खाली दिलेल्या अक्षरात एक पुरुषाचे नाव ,
एक स्त्रीचे नाव व दोन फळांची नावे दडलेली आहेत ती नावे शोधून काढा.
के र ळ श बो व
खेळ ३ : खाली दिलेल्या अक्षरात गावांची ,प्राण्यांची व
झाडांची प्रत्येकी दोन नावे दडलेली आहेत.ती शोधून काढा.
गा व ड य ढ ता
वरील खेळ तुमच्या वहीत लिहून ठेवा.

0 Comments