उखाणेउद्देश: उखाण्यांची माहिती होणे व विचारशक्तीस चालना मिळणे.
सूचना :खाली दिलेल्या उखाण्यांची उत्तरे शोधा.प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण आणि सोडवायला वेळ एक मिनिट.पाहू कोण सर्वात अगोदर ओळखतील सर्व उखाणे.
३१) रत्नात रत्न एक खरे
पण दर महिन्यात एकदा मरे.
३२) एवढासा गडू,
मोठे मोठे लागती रडू.
३३) कोरड्या विहिरीत
पांढरीशुभ्र पाखरे फडफडतात.
३४)एक छोटे गाडगे हलते पण पडत नाही.
३५)वाजते पण ऐकू येत नाही.
३६) एवभढीशी टिटवी,भरलेले तळे आटवी.
३७) एवढीशी पोर,ओझ घेई थोर।
३८) पाहतो सारे जग,
पण न दिसे त्याला त्याचेच अंग.
३९) झाडावर राहतो पण पक्षी नव्हे,
तीन डोळे पण शंकर नव्हे,
वल्कलेधारी पण ऋषिमुनी नव्हे,
पोटात पाणी पण घट नव्हे.
४०) शेलाट्या बांध्याची पण चवळीची शेंग नव्हे,
एक डोळा असलेली पण कावळी नव्हे.
टोचल्यावर रक्त काढते पण काटा नव्हे,
कापड नवे असो वा जुने मी लागतेच.
पण दर महिन्यात एकदा मरे.
३२) एवढासा गडू,
मोठे मोठे लागती रडू.
३३) कोरड्या विहिरीत
पांढरीशुभ्र पाखरे फडफडतात.
३४)एक छोटे गाडगे हलते पण पडत नाही.
३५)वाजते पण ऐकू येत नाही.
३६) एवभढीशी टिटवी,भरलेले तळे आटवी.
३७) एवढीशी पोर,ओझ घेई थोर।
३८) पाहतो सारे जग,
पण न दिसे त्याला त्याचेच अंग.
३९) झाडावर राहतो पण पक्षी नव्हे,
तीन डोळे पण शंकर नव्हे,
वल्कलेधारी पण ऋषिमुनी नव्हे,
पोटात पाणी पण घट नव्हे.
४०) शेलाट्या बांध्याची पण चवळीची शेंग नव्हे,
एक डोळा असलेली पण कावळी नव्हे.
टोचल्यावर रक्त काढते पण काटा नव्हे,
कापड नवे असो वा जुने मी लागतेच.
उत्तरे-३१) चंद्र ३२) कांदा ३३) लाह्या ३४) डोके ३५) थंडी
३६) वात ( दिव्याची )३७) चुंबळ ३८) डोळा ३९)नारळ ४०) सुई

0 Comments