उखाणे
उद्देश: उखाण्यांची माहिती होणे व विचारशक्तीस चालना मिळणे.
सूचना :खाली दिलेल्या उखाण्यांची उत्तरे शोधा.प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण आणि सोडवायला वेळ एक मिनिट.पाहू कोण सर्वात अगोदर ओळखतील सर्व उखाणे.
१) पंख नाहीत पण उडे आकाशी
शेपूट हलवितो पण नाही प्राणी -मी कोण ?
२) वरून लोंबतात मुळे माझी,
गर्द सावली थंडगार,
सावलीत माझ्या विसावतात
सारे लहानथोर
३) एका रिंगणात तीन भाऊ,निरनिराळ्या उंचीचे,
सारखे पळतात गोल गोल न अडखळता न आदळता
४) पाय असून चालत नाही, हात असून काम नाही,
पाठ असून टेकत नाही ओळखा पाहू मी कोण ?
५) लाल रसदार दाणे गर्दीत बसले
सांगा पाहू मी कोण ?
६) सरसर सरसर वाहते,
माणसाच्या उपयोगी पडते,
नदीही नाही मी झराही नाही,
ओढाही नाही मी ओहोळही नाही. मी कोण ?
७)गुरुने दिला हा वसा
शिष्य चालविती वारसा
दिल्याने वाढतच राहते
असे भांडार कोणते ?
८)भाऊ भाऊ दोघे जण,वडील मुलगा दोघे जण,
काका पुतण्या दोघे जण,घड्याळ होती फक्त तीन,
प्रत्येकाच्या वाट्याला आलं एक घड्याळ
सांग बरं हे असं झालं कसं बाळ ?
९) हिरवा हिरवा बंगला
लाल लाल माती
आत राहती भाराभर
काळे आणि गोरे किती !
१०) मी लाल लाल
माझं पागोटं हिरवंगार
ओळखा पाहू
मो कोण सरदार ?
उत्तरे -१) पतंग २) वड ३) घड्याळाचे काटे ४) खुर्ची
५) डाळिंब ६) लेखणी ७) ज्ञान भांडार ८) दोन भाऊ व एका भावाचा मुलगा
९) कलिंगड १०) टोमाटो

0 Comments