उखाणेउद्देश: उखाण्यांची माहिती होणे व विचारशक्तीस चालना मिळणे.
सूचना :खाली दिलेल्या उखाण्यांची उत्तरे शोधा.प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण आणि सोडवायला वेळ एक मिनिट.पाहू कोण सर्वात अगोदर ओळखतील सर्व उखाणे.
४१) दुभागी जीभ पण सर्प नव्हे ,
पाच पती असूनही पांचाली नव्हे,
झरझर झरते पण झरा नव्हे ,
कागदावर उमटवते मी मोती नव्हे.
४२) पर्वतावर रथ चालतो आहे,
सारथी आहे पृथ्वीवर ,
रथ वेगात असला तरी
तसूभर हलत नाही .तो कोण ?
४३) पाण्यामध्ये पोहू शकतो,
जमिनीवर उड्या मारतो,
कीटक,गांडूळ याचे भक्ष्य ,
चिकट जिभेने करतो फस्त ,
असा कोण सांगा सांगा.
४४) जागेवरून हलत नाही,
दिसामाजी वाढत जातो,
स्वावलंबी मी पुरा ,
इतरानाही मदत करतो.मी कोण ?
४५) हे असत भारलेल आकंठ सीलबंद !
असत अगदी निकामी फुटेपर्यंत
किंवा फोदेपर्यंत !
उत्तर -४१) शाईपेन ४२) कुंभाराचे चाक
४३) बेडूक ४४) झाड ४५) अंडे

0 Comments