Subscribe Us

भाषिक खेळ-४३


 उखाणे

उद्देश: उखाण्यांची माहिती होणे व विचारशक्तीस चालना मिळणे.
सूचना :खाली दिलेल्या उखाण्यांची उत्तरे शोधा.प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण आणि सोडवायला वेळ एक मिनिट.पाहू कोण सर्वात अगोदर ओळखतील सर्व उखाणे.

२१)पाय नाही ,चाक नाही जगभर फिरतं
हात नाही, तोंड नाही निरोप सारे सांगतं
अल्पमोली असलं तरी बहुमोल काम याचं
हे कोण ?

२२) नेमकेच पुसून स्वच्छ करी
झाडाचा मी अंश जरी
कणाकणानं झिजत जाई
ओळखायची करा घाई.

२३)चपळ कशी गोगलगाय
तिला लोखंडी पाय
राजा धावत जाय
हाती लागत नाय.

२४) बाळ हातभार
जावळ कोपरभर

२५) पांढऱ्या पाण्यावर पासोडी पसरली
थंड झाल्यावर हळूच काढली.

२६) एवढेसे पोर पण घर राखण्यात थोर

२७) हवेत सोडीत काळ्या रेघा
गावोगावी जाते राणी
लोखंडाचा रस्ता हिचा
सांगा हिला ओळखेल कोणी ?

२८)साता समुद्रापलीकडे राणीने केला भात
एक एक शीत नऊ नऊ हात.

२९)चमचम चांदणी वाटोळे दार
हळूच घाल दादा दुखते फार.

३०)तीन पायांची दगडी राणी
खाते लाकूड पीते पाणी

उत्तरे -२१)पत्र २२)खोडरबर २३) आगगाडी २४)मक्याचं कणीस २५) साय 
२६) कुलूप २७) आगगाडी २८) शेवया २९) बांगडी ३०) सहाण

Post a Comment

0 Comments