Subscribe Us

भाषिक खेळ -४२

 

उखाणे
उद्देश: उखाण्यांची माहिती होणे व विचारशक्तीस चालना मिळणे.
सूचना :खाली दिलेल्या उखाण्यांची उत्तरे शोधा.प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण आणि सोडवायला वेळ एक मिनिट.पाहू कोण सर्वात अगोदर ओळखतील सर्व उखाणे.

११)पाऊस नाही पाणी नाही
रान कसं हिरवं गार
कात नाही चुना नाही
तोंड कसं तांबडंलाल

१२) गोल आहे पण चेंडू नाही
आत लाल पण तिखट नाही
पोटात काळ्या टिकल्या फार
उन्हाळ्यात खाता गारेगार

१३) हळूहळू वाढतो मी हळूहळू घटतो
महिन्यात एक दिवस सुट्टी घेतो
कोण बरं मी ?

१४) सुपले कान खांबासारखे पाय
आखूड शेपटीचा मी कोण ?

१५) काटकुळे पाय उंच उडी खाय,
वार्यासारखे पळत जाय

१६) वरून खरबरीत आकार गरगरीत
पोटात गोड गरे खाता खुशीत

१७) घास घास घासला तर झिजत जातो
कितीही घासा सुगंधच देतो.

१८) डुल डुल डुलतं,वार्रयान हलतं
पाण्यानं वाकतं,जागीच राहतं,ते कोण ?

१९) हरीण पळतं दूध गळतं

२०) आपण उभी राहते
दुसऱ्याला बसवून ठेवते.
भल्याभल्यांच्यात भांडण लावते. 

उत्तरे-११)पोपट १२) कलिंगड १३) चंद्र १४) हत्ती १५) हरीण 

१६) फणस १७) चंदन १८) लव्हाळे १९) जात २०) खुर्ची 

Post a Comment

0 Comments